उर्जाक्षेत्राशी प्रत्यक्ष संबंध नसलेल्या जिज्ञासू नागरिकांना सौर ऊर्जा प्रत्यक्ष कशी वापरायला सुरुवात करता येईल ह्याबद्दल माहिती देणे हे या लेखमालेचे प्रयोजन आहे.
अभिप्राय आणि/किंवा प्रश्न अवश्य लिहावे.
भाग १: सौर ऊर्जेची प्राथमिक माहिती
आपल्याला सौर ऊर्जा प्रामुख्याने दोन तऱ्हेने मिळते, प्रकाश आणि उष्णता.
यापैकी उष्णतेचा उपयोग घरगुती प्रमाणावर पाणी तापवणे किंवा पदार्थ वाळवणे यासाठी केला जातो, तर मोठ्या प्रमाणात किंवा औद्योगिक स्तरावर सूर्याच्या उष्णतेपासून वाफ निर्माण करून त्यावर जनित्रे (टर्बाईन) चालवून वीजनिर्मिती करतात.
सूर्य प्रकाशाचा उपयोग थेट प्रकाश म्हणून तर होतोच, परंतु सूर्यास्तानंतर प्रकाश / ऊर्जा मिळवता यावी यासाठी विशेष योजना करावी लागते.
आपल्या घरात, कचेऱ्यांमध्ये, शेतीमध्ये किंवा कारखान्यांमध्ये विजेचा विवीध प्रकारे करता येऊ शकणारा वापर आणि त्यामुळेच निर्माण झालेले विजेचे महत्व काही वेगळे सांगायची गरज नाही.
वीज किंवा विद्युत-ऊर्जा अनेक मार्गांनी आपल्याला वापरायला सोयीची ठरते, त्यामुळे गेली कित्येक दशके पारंपारिक पद्धती वापरून वीजनिर्मिती सुरु आहे, आणि ह्या पृथ्वीवर विजेचा वापर यथेच्छ सुरु आहे.
पारंपारिक पद्धतींमध्ये कोळसा किंवा जीवाश्म इंधने (पेट्रोलियमजन्य ज्वलनशील पदार्थ) वापरून वीजनिर्मिती केली जाते आणि त्यातून निर्माण होतात – प्रदूषणकारी वायू आणि वातावरणातील प्रतिकूल बदल.
प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि दुसऱ्या बाजूला इंधनांचे संपत चाललेले साठे व त्या अनुषंगाने वाढत चाललेल्या किंमती यावर उतारा म्हणून सौरऊर्जेचा सशक्त पर्याय पुढे येत आहे.
सूर्यप्रकाशापासून थेट वीज निर्माण करू शकणारी सौरविद्युत पॅनेल्स गेल्या बऱ्याच वर्षांपासून उपलब्ध आहेतच आणि निर्मितीप्रक्रीयेतील संशोधन व सुधारणांमुळे पॅनेलच्या किंमती मोठ्या प्रमाणावर कमी होऊन स्थिरावल्या आहेत.
आपल्या घरात वीजमंडळाने पुरविलेल्या विजेला सोलर पॅनल वापरून निर्माण केलेली वीज पर्याय ठरू शकते आणि अश्या प्रकारे सोलर पॅनेल्स बसवून आपले विजेचे बिल देखील कमी करता येऊ शकते.
ह्यासाठी सर्वसाधारणपणे तीन प्रकार उपलब्ध आहेत.
१. बॅटरीचा वापर करून
२. वीजजोडणीचा वापर करून
३. सौरविजेचा थेट वापर
आपण याबद्दलची माहीती क्रमशः घेऊया…….
The purpose of this set of articles is to provide information about how to start using solar energy, to the curious citizens who are not directly related to the energy sector.
Feedback and / or questions are anticipated.
Part 1: Basic information on solar energy
We get solar energy in two main ways, light and heat.
Most of the heat part is used for domestic water heating or drying, while on a larger / industrial scale, electricity is produced by generating steam from the heat of the sun and running turbines.
Sunlight is used as direct light, but special arrangements have to be made to be able to use the energy after sunset.
Needless to say, the ease of use of electricity in our homes, offices, farms or factories and hence the importance of electricity is already very well established.
Electricity or power-energy is convenient for us to use in many ways, so since last several decades electricity is being generated using traditional methods, and there is large scale consumption of electricity common across all countries in the world.
Traditional methods generate electricity using coal or fossil fuels (petroleum based substances) and it leads to release of polluting gases and also results in adverse impact on our climate.
A strong alternative of solar energy is emerging, to curb pollution and, on the other hand, to tackle the depleting fossil fuel reserves and their rising prices.
Solar panels that can generate electricity directly from sunlight have been available for many years, and research and improvements in the manufacturing process has led to a significant reduction in panel prices. As of now the prices are fairly stabilized.
Electricity generated using solar panels can be an alternative to the electricity supplied to our home by the power board and thus installing solar panels can also reduce electricity bills.
There are generally three types of systems available for using solar energy for electricity.
1. Battery based systems
2. Grid connected systems
3. Direct use of solar electricity
We will look at these options in subsequent articles…..