Categories
Solar Energy

सौर ऊर्जा आणि आपण – २

भाग २ – घरगुती वापराची वीज

Part 2 – Electicity for Household Use

घरात आपण वापरतो ती वीज आपल्याला वीजमंडळाच्या वीजजाळ्यातून (इलेक्ट्रिक ग्रीडमधून ) मिळते.

The electric energy that we use in our households is available to us from the electric grid of the supply company.


वीजजोडणी १ किंवा ३ फेज ची असते, साध्या वापरासाठी १ फेजचा वीजपुरवठा पुरेसा होतो, परंतु जास्त वापर करणारी उपकरणे जसे की मोठ्या क्षमतेचे पंप , यंत्रसामग्री इत्यादी साठी ३ फेज पुरवठा सोयीचा होतो .

The electric connection is either 1 phase or 3 phase, for small scale household usage single phase connection is adequate, but for large sized pumps and equipment a 3 phase supply is better and recommended.


आपण वापरतो त्या विजेचे बिल आपल्या वापराच्या युनिट नुसार वीजमंडळ दरमहा आपल्याला देते आणि त्याचा भरणा वेळेवर न केल्यास आपली विजेची जोडणी खंडीत करण्याचे अधिकार वीजमंडळास असतात.

The monthly electric bill is generated based on the units of electricity that we use, if not paid within stipulated time, the electric supply company can disconnect the electric supply to the consumer.


वीजवापर मोजण्यासाठी एक मीटर बसविलेला असतो आणि त्यावर आपल्या विजेच्या वापराची संख्या के-डब्ल्यू-एच (KWH) (सर्वसामान्यपणे युनिट असे म्हटले जाते) मध्ये सतत दाखविली जाते.

To measure the consumption of the electricity, an energy meter is installed at the premise of the consumer. On the display of this meter, the accumulated consumption of electricity is continiously displayed in KWH units.


आपल्या माहितीकरिता आणि कुतूहल म्हणून आपण आपल्या मीटर वर सतत दाखवल्या जाणाऱ्या आकड्यांचा परिचय करून घेतलेला बरा.

It is a good thing to know the location and details on the display of our own energy meter.


वेगवेगळ्या कंपन्यांचे मीटर थोड्या फार फरकाने विविध प्रकारची माहिती स्क्रीनवर एकामागून एक दाखवत राहतात – दिनांक, वेळ, आतापर्यंत झालेल्या वीजवापराची युनिटे अर्थात के-डब्ल्यू-एच (KWH)

Energy meters from various companies, with small differenece here and there, keep scrolling the information on the display – typically date, time, accumulated energy units KWH used so far till any given point of time.

आता थोडेसे विजेच्या परिमाणा-विषयी (युनिट)

Now let us understand the unit of electricity consumed

सर्व प्रकारच्या ऊर्जेचे परीमाण वॅट हे असते आणि किती वॅट ऊर्जा किती वेळासाठी वापरली ह्याचे परीमाण के-डब्ल्यू-एच (KWH) असे आहे.

All types of energies (rather power or the rate of consumption of energy) is Watt, and how much energy used for how long is often expressed as KWH units.

तर अश्या प्रकारचे १ युनिट म्हणजे नक्की किती ऊर्जा?

So how much really is a 1 KWH?

तर १०० वॅट चा एक दिवा १० तास सुरु ठेवला तर १ युनिट वीज वापरली जाते.

If we operate a 100 watt light bulb for 10 hours, it is 1000 Watt Hour or 1KWH.

किंवा १००० वॅट (१ किलोवॅट) ची इस्त्री १५ मिनिटे (एक चतुर्थांश तास) वापरली तर ०.२५ युनिट वीज वापरली जाते.

If we use an electric iron of 1000 watt capacity, for 15 minutes, then it is 1000×15/60 = 0.25 KWH units.

किंवा २००० वॅट चा पाणी तापवायचा रॉड हीटर अर्धा तास वापरला तर १ युनिट वीज वापरली जाते.

An electric rod type immersion water heater of 2000 watt if used for half an hour then 2000×0.5=1000 Watt Hour or 1 KWH units are consumed.

ह्या पद्धतीने आपण आपल्या घरातल्या विविध उपकरणांचा जितका वेळ वापर केला जातो त्यावरून विजेच्या युनिटांचा अंदाज किंवा गणित करू शकतो.

Going by this simple calculation we can determine the approximate consumption of electricity in our home on a daily or monthly basis.

वीजवापरासाठी वीजमंडळ वेगवेगळे आकार (चार्जेस) लागू करते ,जसेकी….

Electricity company charges various rates under different heads of charges as below.


स्थिर आकार – कितीही कमी अथवा जास्त वीज वापरली तरी ही ठरावीक रक्कम दरमहा बिलामध्ये घेतली जाते, सिंगल फेज साठी सध्याचा स्थिर आकार ८० ते ११० रुपये आहे.

Fixed Charges – No matter how much electricity the consumer uses in a month, this charge will always be applied in every bill. As of now this is 80 to 110 INR per month for a single phase connection.


वीज आकार – हा आकार मुख्यत्वे वीज वापरासाठीच आहे
Electricity Charges – This is the charge directly applicable for the units of electricity consumed.

वहन आकार – मंडळाच्या वीजवाहिन्यांचे जाळे वापरून आपल्याला वीज मिळते, त्यापोटी द्यावा लागणार आकार
Wheeling or Transmission Charges – This is in a way the charges for providing electricity at a location away from the point of generation, basically the transmission related charge/cost.

इंधन समायोजन आकार – इंधनाचे दर कमी किंवा जास्त होतात त्यानुसार हा आकार लावला जातो

Fuel adjustment charges – This is levied due to changes in the cost of fuel that goes into generating the electricity in the power plants.

वीज शुल्क – वीजवापराचे शुल्क

Energy Charges – Similar to electricity charges, but just a different charge head.

वीज विक्री कर – वीजविक्री करताना लावावयाचा कर
Electricity Tax on Sale – Tax as a part of electricity sales by the supply company to the consumer.

ह्यातील स्थिर आकार वगळता इतर सर्व आकार वीजवापराच्या युनिट वर अवलंबून असतात, अर्थातच जितकी युनिट जास्त वापरली जातील तितके हे सर्व आकार त्या प्रमाणात लागू होणार.

Out of the various types of charges, all charges except Fixed charges are directly proportional to the units of electricity consumed. In a way these are all variable charges and will be higher in propotion to the units consumed.


त्यातही युनिटच्या पायरीपद्धतीने दर-आकारणी केली जाते ०-१०० युनिट ३ रुपये प्रति युनिट, त्यापुढील युनिट ला १०१ -३०० युनिट मध्ये गेल्यास ६ रुपये प्रति युनिट असे चढे दर लागू होतात.

Variable charges are mostly grouped in increasing slabs of consuption, e.g. 0-100 units 3 INR per unit, 101 to 300 units are charged at 6 INR per unit.


आणि ही दर आकारणी ग्राहकाच्या टॅरीफ (वीजदरतक्ता ) नुसार बदलते, साधारणपणे MSEDCL च्या सर्वसाधारण वीज ग्राहकाला 090 /LT-I (B) Residential 1Ph हा टॅरीफ लागू असतो, परंतु असे अनेक टॅरीफ नेमून दिलेले आहेत आणि त्या त्या प्रमाणे दर आकारणी केली जाते.

This actual rates of various charges are also dependent on the tariff category assigned to the consumer. As an example, for the standard residential consumer, MSEDCL in Maharashtra applies a tariff – 090 /LT-I (B) Residential 1Ph

1 reply on “सौर ऊर्जा आणि आपण – २”

Leave a Reply