Water, Energy and Environment
A community initiative towards conservation of the critical elements of our life.
Wee can make it, if we maintain the focus...
आमच्याविषयी थोडक्यात / आम्ही काय करतो...
ठाणे जिल्हा परीषदेच्या शाळांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी विविध गट आणि संस्था कार्यरत आहेत.यामध्ये प्रामुख्याने ठाणे येथील मालती वैद्य स्मृती ट्रस्ट, तसेच आय.आय.टी. बॉम्बे, मुंबई येथील माजी विद्यार्थ्यांचा रूरल इनिशिएटिव्हज ग्रुप आणि वेगवेगळ्या कार्यक्षेत्रातील सेवाभावी व्यक्तींनी एकत्र येऊन तयार केलेला वॉटर ग्रुप यांचा समावेश आहे.ह्या सर्वांकडून राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहीती देण्यासाठी एक ZPS Thane नावाचा व्हाट्सअँप ग्रुप तयार केलेला आहे.सर्व तालुक्यांमध्ये बहुसंख्येने जि.प. शाळा आहेत. तेथील शिक्षकांशी थेट संपर्क साधून आम्ही शाळेतील त्रुटी, कमतरता जाणून घेतो आणि त्यानंतर यथाशक्ती सहाय्य करतो.शिक्षकांचे संपर्क क्रमांक मिळवणे आणि शाळेला भेडसावणाऱ्या समस्यांची प्रत्यक्ष आणि अचूक माहीती गोळा करणे हे एक मोठे काम आहे.यासाठी आम्ही खालील सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
वेगवेगळ्या तालुक्यांसाठी स्वतंत्र व्हाट्सअँप ग्रुप
खालील दोन पर्यायांसाठी आपला गुगल लॉगिन वापरून प्रवेश करणे आवश्यक आहे. लॉगिन केल्यानंतर आपल्याला ज्या व्यक्तीमार्फत या वेबसाईट बाबत समजले त्यांना आपल्या लॉगिन आयडीसह आपली ओळख पटवून देणे आवश्यक आहे.
वरीलपैकी कुठल्याही सोयीच्या माध्यमाद्वारे आपण आमच्याशी संपर्क साधू शकता. आमच्या बाजूने सर्वतोपरी सहकार्य आणि सहभाग मिळावा यासाठी आम्ही अवश्य प्रयत्नशील राहू.